Friday, November 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedआंदोलन, उपोषणाशिवाय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड,कोपरगाव नगरपरिषदेचा दिलासादायक निर्णय!!

आंदोलन, उपोषणाशिवाय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड,कोपरगाव नगरपरिषदेचा दिलासादायक निर्णय!!

कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव नगरपरिषदेच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची आर्थिक दिवाळी यंदा खऱ्या अर्थाने गोड झाली आहे. दिवाळी सणाचे औचित्य साधून नगरपरिषदेच्या वतीने सर्व संबंधितांचे पगार देणी, ॲडव्हान्स तसेच पेन्शनविषयक रक्कम वेळेत अदा करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.विशेष म्हणजे, नगरपरिषदेतील सफाई कामगारांना यापूर्वी आपल्या हक्काच्या पगारासाठी आणि देणी मिळवण्यासाठी अनेकदा संघर्ष करावा लागत होता. कधी निवेदने, कधी आंदोलने तर कधी उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत होता. मात्र यंदा कोणतेही आंदोलन, उपोषण किंवा संघर्ष न करता कर्मचाऱ्यांच्या हक्काची रक्कम वेळेत त्यांच्या हातात पडली आहे. ही बाब निश्चितच समाधानकारक आणि सकारात्मक बदलाची नांदी ठरणारी आहे.यावेळी सफाई कामगारांचे दोन महिन्यांचे वेतन दिवाळी ॲडव्हान्स, कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे पगार तसेच काही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित पेन्शन व इतर देणी व्यवस्थितपणे अदा करण्यात आली आहेत. त्यामुळे सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला असून आपल्या कुटुंबासमवेत आनंदाने दिवाळी साजरी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना सणाच्या काळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी नगरपरिषदेने घेतलेली ही भूमिका निश्चितच कौतुकास्पद आहे. कर्मचाऱ्यांचे प्रश्न वेळेत मार्गी लागले तर प्रशासनाविषयी विश्वास वाढतो आणि काम करण्याची प्रेरणाही मिळते, याचे हे उत्तम उदाहरण आहे.या सकारात्मक निर्णयाबद्दल नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान आणि मुख्याधिकारी अजित निकत,आरोग्य सभापती वैभव आढाव यासह सर्व नगरसेवक यांचे सर्व कर्मचारी व कामगारांच्या वतीने विनोद राक्षे यांनी विशेष आभार व्यक्त केले आहेत. कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी घेतलेल्या या पुढाकाराचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!