Friday, November 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedआ. विवेक कोल्हे यांच्या लोकसंवाद उपक्रमास तुफान प्रतिसाद!!

आ. विवेक कोल्हे यांच्या लोकसंवाद उपक्रमास तुफान प्रतिसाद!!

कोपरगाव प्रतिनिधी

सणासुदीचे दिवस आहे, खरीप वाया गेल्यांने शेतकरी होरपळलेला आहे, रब्बीचा भरवसा राहिला नाही, शेतक-यांकडील पशुधन जगविण्यासाठी त्याला पाण्याची नितांत गरज आहे, महायुती शासन सर्वसामान्यांसह शेतक-यांच्या तसेच दुष्काळाच्या प्रश्नांवर गांभीर्यपुर्वक काम करत आहे, तेंव्हा गोदावरी डावा व उजव्या कालव्यांना १ डिसेंबर ऐवजी १५ नोव्हेंबर रोजी पाटपाण्यांचे आर्वतन तात्काळ सोडावे, शेतकरी हित जोपासले तरच कोपरगांवची बाजारपेठ फुलेल, ग्रामिण भागात वीज वितरण कंपनीने ठरविलेल्या वेळापत्रकाप्रमाणे वीज मिळत नाही तेंव्हा वीज वितरण कंपनीने त्यात तात्काळ सुधारणा करावी अन्यथा अधिका-यांनी सणासुदीचे काळात जनतेच्या रोषाचे धनी होवु नये, दुष्काळाचे संकट मोठे आहे तेंव्हा शासन प्रशासन आणि जनता अशा एकजुटीने आपण या संकटाची तीव्रता कमी करण्याचा जाणिवपुर्वक प्रयत्न करू असे प्रतिपादन आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी केले. कोपरगांव शहर व विधानसभा मतदार संघातील सार्वजनिक तसेच व्यक्तीगत अडी अडचणींच्या सोडवणुकीसाठी आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी प्रथमच गुरूवारी तहसिल कार्यालयाच्या आवारात लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यात ते बोलत होते. प्रारंभी तहसिलदार महेश एन. सावंत यांनी प्रास्तविक केले. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे व सर्व संचालकांनी उपस्थितांचे स्वागत केले. आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी त्यांच्या विधानपरिषद कारकिर्दीची सुरूवात जनतेचे हिताचे प्रश्न समजुन घेण्यासाठी लोकसंवाद संकल्पना राबविली त्यात तक्रारींचा अक्षरशा पाउस पडला. ४९३ सार्वजनिक हिताच्या तर १०९ व्यक्तीगत अशा एकुण ६०२ तक्रारी प्राप्त झाल्या यासह १२५ हून अधिक ऐनवेळी आलेल्या अर्जावर दुपारी १२ वाजता सुरू झालेला लोकसंवाद साडेपाच वाजता संपला. यात गांवोगांवचे शेतकरी, विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, विविध कार्यकारी सोसायटयांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, साखर कारखान्याचे आजी माजी संचालक, महिला बचतगटाच्या भगिनी पदाधिकारी, संजय गांधी श्रावणबाळ निराधार योजनांचे वयोवृध्द लाभार्थी, दिव्यांग आदि स्तरांतील नागरिकांनी प्रश्न उपस्थित करून त्याची सोडवणुक करून घेतली.कोपरगांव तालुक्यात मोलमजुरी करून चरितार्थ चालविणां-या काही महिला भगिनींकडुन ५ हजार ८०० रूपये गोळा करून त्यांना पिठाच्या गिरणीचे अमिष दाखविले गिरणीतर मिळालीच पण पैसेही गेले आम्ही जगायचे कसे अशी तक्रार असंख्य महिलांनी केली त्यावर आमदार विवेकभैय्या कोल्हे म्हणांले हा भाउ तुमच्या पाठीशी आहे, घाबरू नका यात मार्ग काढू, पोलिस प्रशासनांने या तक्रारीचा छडा तात्काळ लावुन यातील फसवणुक झालेल्या महिलांना न्याय द्यावा असे सांगितले.गोदावरी डाव्या आणि उजव्या कालव्याच्या उपचा-यांच्या दुरूस्तीवर लाखो रूपये खर्च केल्याचे कागदोपत्री दाखविले जाते पण प्रत्यक्षात या उपचा-यांची कामेच झाली नाही त्यामुळे पाटपाणी आर्वतन काळात शेतक-यांच्या शेतीला पाणीच मिळत नाही, उजव्या कालव्यावरील हरिसन ब्रांच चारीला ३० मैलावर जो कलवर्ट बसविला तो चुकीच्या पध्दतीने बसविला त्यामुळे टेलला पाणी देतांना वर पाण्याचा फुगवठा निर्माण होतो त्यातुन शेतक-यांच्या शेतीचे नुकसान होते, पाण्यांचे आर्वतन १ डिसेंबरला सोडले तर चारापिकासह सर्वच धुळधाण होईल अशी भिती शेतक-यांनी व्यक्त करत आर्वतन तातडीने सोडावे अशी मागणी केली.कोपरगांव तालुक्यात अन्य गावांना गावठाण म्हणून जमिन मिळाली पण कान्हेगांव वारी या गावांना वारंवार मागणी करूनही शासन त्याकडे लक्ष देत नाही तेंव्हा या प्रश्नांत आमदार विवेक भैय्या कोल्हे, तहसिलदार व संबंधित एजन्सींनी एकत्र येवुन हा प्रश्न निकाली लावावा व शेती महामंडाळाची जमिन वारी कान्हेगावाला मिळवुन द्यावी अशी मागणी केली. शिवरस्त्याच्या प्रश्नांवर अनेक शेतक-यांनी प्रशासनांस धारेवर धरले, तहसिल कार्यालयात हेलपाटे मारून मारून आमचा संयम आता सुटला आहे तेंव्हा यात मार्ग काढावा अशी आर्त हाक अनेकांनी दिली. श्रावणबाळ, संजय गांधी निराधार, दिव्यांग आदि योजनांच्या कामासाठी एजंटमार्फत दाखल केलेल्या अर्जाना न्याय मिळतो आणि आम्ही गरीब, आमच्याकडे पैसे नाही म्हणून आमची प्रकरणे गहाळ केली जातात, त्यावर सहा महिने वर्षभर तहसिलला हेलपाटे मारूनही न्याय मिळत नाही अशा तक्रारी असंख्य महिलांनी यावेळी केल्या त्यावर आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी संबंधीत यंत्रणेस यात लक्ष घालुन गोर गरीब महिलांना न्याय द्यावा व एजंट मध्यस्थांनी अशी कामे करू नये अशा सुचना दिल्या.दुष्काळाच्या संकटामुळे आता दिवसाढवळया भुरट्या चो-या वाढल्या आहेत, नदीकाठच्या तसेच अन्य ठिकाणचे शेती वीजपंप मोठ्या प्रमाणांत चोरीला जात आहे, भंगारवाले आणि चोर यांची गट्टी आहे त्यावर पोलिस प्रशासन कारवाई करणार आहे की, नाही. तालुक्यात अनेक ठिकाणी बंधारे आहेत त्यातील जमिनी विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणांत झाले आहे त्यावर कुणाचाच वचक राहिलेला नाही. ब्रिटीशकालीन चर बुजले आहे त्याचे खोलीकरण करण्यांत यावे, तालुक्यात ६०० हेक्टर वन विभागाची जमिन आहे पण त्यावर पर्यावरणाचा हेतु साध्य होत नाही, गोर गरीब आदिवासी बांधवांना कसण्यासाठी दिलेल्या वन जमिनीतुन बेकायदा मुरूम, पोयटा, माती बेमालुमपणे वाहतुक सुरू आहे त्याबाबत वनविभागाकडे तक्रारी केल्या तर त्यांचे अधिकारी व डंपरवाले यांचे साटेलोटे आहे तेंव्हा या जमिनी अशाच खोदल्या गेल्या तर आम्ही कुणांकडे न्याय मागायचा अशा तक्रारी आदिवासी बांधवांनी केल्या. बिबटयांचा वावर वाढला आहे, रेशनकार्डवरील धान्य अचानक बंद केल्याने गोर गरीबांनी जगायचे कसे, कोपरगांव शहरासाठी १ ते ५ साठवण तळे असुनही शहरवासियांना पाणी मिळत नाही, पाटपाण्यांचे नियोजन अधिकारी वेळेवर सांगत नसल्याने पालिका प्रशासनांचे हाल होतात आणि शहरवासियांच्या रोषाला नगरसेवकांना सामोरे जावे लागते, मोरवीस शाळेसाठी ३६ लाख रूपयांचा निधी आला पण भूमि अभिलेख आणि तहसिल यांच्या वादात तो परत गेला त्यामुळे प्राथमिक शिक्षण घेणारी मुले मुली शाळा निवा-यापासुन वंचित आहे, शासनाने शेतक-यांना दिलेली कर्जमाफी आणि सहकारी सोसायटया यांना आलेला व्याजाचा भूर्दंड यावर मार्ग काढण्याकरीता जिल्हा बँक प्रशासनस्तरावर बैठक घेवु, असे आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी सांगितले. व्यक्तीगत तक्रारींची निवेदन घेवुन आमदार विवेकभैय्या कोल्हे यांना भेटणारी मंडळींची गर्दी व्यासपिठावर मोठ्या प्रमाणांत होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!