

कोपरगाव प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकूण २१ जागांपैकी ११ जागेवरील उमेदवार बिनविरोध निवडून आले असून उर्वरित १० जागांसाठी सोमवार (दि.०२) रोजी मतदान पार पडले.कोपरगाव शहरातील कोपरगाव नगरपालिकेच्या ०६ नंबर शाळेतील मतदान केंद्रावर जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील शेती पूरक मतदार संघातून सहकार विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार आशुतोष काळे तसेच जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे यांनी मतदान केले.


