Saturday, October 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedकराटे स्पर्धेत कु. वर्धा विजय पवार हिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड!!

कराटे स्पर्धेत कु. वर्धा विजय पवार हिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड!!

कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाची विद्यार्थिनी कु. वर्धा विजय पवार हिने बारामती (पुणे) येथे पार पडलेल्या शालेय शासकीय विभागीय कराटे स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत २२ किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला. या शानदार यशाच्या जोरावर तिची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या या यशामुळे श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

बारामती (पुणे) येथे आयोजित शालेय शासकीय विभागीय कराटे स्पर्धेत विविध शाळांमधील खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत कु. वर्धा पवार हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली आणि २२ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळविण्याचा बहुमान पटकावला. तिच्या या यशामुळे आता तिला राज्यस्तरावर आपल्या खेळाचे कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे.श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाचे क्रीडा शिक्षक श्री. निलेश बडजाते यांनी तिला मार्गदर्शन केले आहे.

कराटेसारख्या मार्शल आर्ट प्रकारात यश मिळविण्यासाठी नियमित सराव, शारीरिक क्षमता, एकाग्रता, शिस्त, आत्मविश्वास आणि जिद्द यांची आवश्यकता असते. या सर्व गुणांच्या जोरावर वर्धाने मिळविलेले यश निश्चितच कौतुकास्पद आहे. तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झालेली निवड ही विद्यालयासाठी अभिमानाची बाब असून इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरणारी आहे.

या यशाबद्दल कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. कैलास ठोळे, सचिव श्री. दिलीप अजमेरे, सहसचिव श्री. सचिन अजमेरे, खजिनदार श्री. आनंद ठोळे, सदस्य डॉ. अमोल अजमेरे, सर्व संचालक मंडळ तसेच मुख्याध्यापक श्री. सुरेंद्र शिरसाळे, उपमुख्याध्यापिका श्रीमती सुजाता अजमेरे, पर्यवेक्षक श्री. बलभिम उल्हारे आणि विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी कु. वर्धा पवार हिचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!