Wednesday, November 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedगौतम बँकेच्या सभासदांना दिवाळीपूर्वीच३८.७९ लाखांच्या लाभांशाचे वाटप!!-आ.आशुतोष काळे

गौतम बँकेच्या सभासदांना दिवाळीपूर्वीच३८.७९ लाखांच्या लाभांशाचे वाटप!!-आ.आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव परिसरातील शेतकरी, कष्टकरी आणि शेतमजुरांच्या आर्थिक उन्नतीसाठी मा.खा.स्व.कर्मवीर शंकररावजी काळे यांनी सहकाराच्या माध्यमातून विविध संस्था उभारून सर्वसामान्यांच्या प्रगतीचा भक्कम पाया रचला. या संस्थांना पोटच्या लेकराप्रमाणे जपत त्यांनी सहकार चळवळीला लोकाभिमुख दिशा दिली. त्याच विचारधारेतून स्थापन झालेल्या गौतम सहकारी बँकेने उत्कृष्ट व पारदर्शक कारभाराच्या बळावर सभासदांचा विश्वास संपादन करत आर्थिक प्रगतीची परंपरा कायम राखली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये बँकेने मिळविलेल्या नफ्याचा लाभ सभासदांपर्यंत पोहोचवितांना ३८ लाख ७९ हजार ३६३ रुपयांचा लाभांश दिवाळीपूर्वीच मंगळवार (दि.३) रोजी सभासदांच्या बँक खात्यात थेट जमा केला असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.सहकारी संस्था या खऱ्या अर्थाने सभासदांच्या हक्काच्या असतात.या संस्था काटकसरीने कशा चालवायच्या आणि सभासदांचे हित कसे जपायचे याचा आदर्श वस्तुपाठ मा.खा.स्व.कर्मवीर शंकररावजी काळे यांनी घालून दिला आहे. त्यांच्या आदर्श विचारांवर व माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहातील सर्व संलग्न सहकारी संस्थांची वाटचाल सुरु असून गौतम बँक देखील प्रगतीच्या दिशेने घौडदौड करीत आहे. त्यामुळे दरवर्षी दिवाळीच्या काळात सर्व सभासदांना लाभांश दिला जात असल्यामुळे याहीवर्षी गौतम बँकेच्या सर्व सभासदांना दिवाळीपूर्वी लाभांश देण्यात आला आहे. बदलत्या काळानुसार बदल करून गौतम बँकेने अत्याधुनिक बँकिंग प्रणाली स्वीकारली आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकेच्या बरोबरीने ग्राहकांना सेवा पुरविल्या जात आहेत.नागरिकांच्या कष्टाच्या पैशाची सुरक्षितता जपण्यासोबतच संस्थेची उत्तरोत्तर प्रगती साधणे हेच मुख्य उद्दिष्ट असल्यामुळे योग्य कर्जवाटप, वसुली आणि प्रशासकीय शिस्त यामुळेच बँक सातत्याने नफ्यात राहून सभासदांना लाभांश देणे शक्य झाले असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.
बँकेचे चेअरमन संजय आगवण,व्हा.चेअरमन विजय रक्ताटे व त्यांचे संचालक मंडळ तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण पावडे,प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमुड व त्यांचे सहकारी कर्मचारी करीत असलेल्या नियोजनबद्ध कारभाराचे आ.आशुतोष काळे यांनी कौतुक केले आहे. सर्व सभासदांच्या खात्यात लाभांशाची रक्कम वेळीच जमा करून दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर दिवाळीपूर्वीच थेट खात्यात लाभांश जमा झाल्याने सभासदांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण पसरले असून सभासदांकडून आभार व्यक्त केले जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!