Wednesday, November 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedनागपुर मुंबई समृध्दी महामार्गासाठी कोकमठाण परिसरात पोलिस मदत केंद्र व नियंत्रण कक्ष...

नागपुर मुंबई समृध्दी महामार्गासाठी कोकमठाण परिसरात पोलिस मदत केंद्र व नियंत्रण कक्ष स्थापण्यांस मंजुरी!!-आमदार विवेकभैय्या कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी

राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचा स्वप्नवत प्रकल्प असलेला नागपुर मुंबई समृध्दी महामार्ग महायुती शासननि पुर्ण केला, या महामार्गावरून धावणा-या वाहनांच्या तसेच प्रवाशांच्या सुरक्षेलाही कर्तव्यदक्ष गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी प्रथम प्राधान्य देत समृध्दी महामार्गासाठी १५ महामार्ग पोलिस मदत केंद्र व एक नियंत्रण कक्ष स्थापन करून त्याच्या खर्चास मान्यताही दिली त्यात आंतरराष्ट्रीय देवस्थान असलेल्या श्रीसाईबाबांच्या शिर्डीनजिक इंटरचेंज कोकमठाण येथेही एक पोलिस मदत केंद्र व नियंत्रण कक्ष स्थापण्यांस मंजुरी दिली अशी माहिती आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी दिली.
शासनांच्या गृह विभागामार्फत ३ नोव्हेंबर रोजी एपीओ ५२२ शासन निर्णय जारी करण्यांत आला असुन त्यात १५ महामार्ग पोलिस मदत केंद्र व १ नियंत्रण कक्षासाठी आवश्यक असलेल्या पोलिस संरक्षण बळास ४३ कोटी ४७ लाख ३३ हजार ४२४रूपये आर्वती तर ७ कोटी ४५ लाख ८८ हजार ९६६ रूपये अनावर्ती खर्चास मान्यता दिली आहे. या संपुर्ण महामार्गासाठी १६ सहायक पोलिस निरीक्षक, ३२ पोलिस उपनिरीक्षकछ ४८ सहायक पोलिस उपनिरीक्षक, २७६ पोलिस शिपाई तर ४८ चालक पोलिस शिपाई या पदांची निर्मीती करण्यांत आली आहे.विवेकभैय्या कोल्हे यांनी पत्रकांत पुढे म्हटले आहे की, मध्यंतरी या महामार्गावर शिर्डी नजिक तर इगतपुरी, वैजापूर , छत्रपती संभाजीनगर जवळ रात्री अपरात्री वाहने अडवुन त्यांच्याकडील मुददेमालाची मोठया प्रमाणांत लुटालुट करण्यांत आली होती ही बाब मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आणुन देवुन समृध्दी महामार्गावर तातडीने सुरक्षा दले तैनात करून यावरून रात्री अपरात्री प्रवास करणा-या वाहनधारकासह प्रवाशांना सुरक्षा द्यावी म्हणून आपण मागणी केली होती त्याचप्रमाणे विधीमंडळाच्या अधिवेशनांतही हा प्रश्न उपस्थित करण्यांत आला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदरची बाब गंभीर्याने घेत सदर महामार्गाच्या सुरक्षेचा प्रश्न निकाली काढला आहे. कोकमठाण शिर्डी इंटरचेंज महामार्ग पोलिस मदत केंद्रासाठी २७ पोलिस अधिका-यांचा स्टाफ यातुन मिळणार आहे त्याबददल महायुती शासनांचे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!