Sunday, October 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedहरिसन ब्रँचलगतच्या शेतकऱ्यांनी सात नंबर फॉर्म भरावेत!!- संचालक मधुकर वक्ते

हरिसन ब्रँचलगतच्या शेतकऱ्यांनी सात नंबर फॉर्म भरावेत!!- संचालक मधुकर वक्ते

जेऊर कुंभारी वार्ताहर

गोदावरी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी रब्बी व उन्हाळी हंगामाकरिता प्रत्येकी एक आवर्तन जाहीर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर हरिसन ब्रँच कालव्यालगतच्या शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सात नंबरचे पाणी मागणी अर्ज भरावेत, असे आवाहन महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक मधुकर वक्ते यांनी केले आहे.
सध्या पावसाचे अनिश्चित प्रमाण, घटती भूजलपातळी आणि सिंचनाच्या पाण्याची वाढती गरज यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध होणाऱ्या कालव्याच्या पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून, त्याचे योग्य नियोजन करून जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणणे गरजेचे आहे.
हरिसन ब्रँच कालव्याच्या लाभक्षेत्रातील जेऊर कुंभारी, कोकमठाण, चांदेकसारे व डाऊच परिसरातील शेतकऱ्यांनी सात नंबरचे फॉर्म भरून पाणी मागणी नोंदवावी. सर्व शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेत आपल्या शेतात पाणी फिरविल्यास रब्बी व उन्हाळी पिकांना मोठा आधार मिळू शकतो. तसेच जमिनीत पाणी मुरल्यामुळे भूजलपातळी टिकवून ठेवण्यास मदत होईल.
कालव्याला पाणी आल्यानंतर त्याचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन आणि शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेत सात नंबरचे अर्ज भरून सिंचनासाठी आपली मागणी नोंदवावी. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि पाण्याचा अपव्यय टाळावा, असेही आवाहन संचालक मधुकर वक्ते यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!