Friday, October 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedजेऊर कुंभारीत बिबट्याचा धुमाकूळ; उपसरपंच जालिंदर चव्हाण यांची तातडीच्या उपाययोजनांची मागणी!!

जेऊर कुंभारीत बिबट्याचा धुमाकूळ; उपसरपंच जालिंदर चव्हाण यांची तातडीच्या उपाययोजनांची मागणी!!

सलग दोन दिवसांत दोन शेळ्या फस्त; पशुपालक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण!!

जेऊर कुंभारी वार्ताहर

जेऊर कुंभारी परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांसह शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याने काल आणि आज अशा सलग दोन दिवसांत दोन शेळ्यांवर हल्ला करून त्यांना ठार केले. यामध्ये प्रभाकर गोरखनाथ देवकर आणि गणेश चांगदेव देवकर यांच्या प्रत्येकी एका शेळीचा बिबट्याने फडशा पाडला आहे. या घटनांमुळे परिसरातील पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी शेळीपालन करतात. मोठ्या कष्टाने आणि आर्थिक गुंतवणुकीतून सांभाळलेल्या शेळ्या बिबट्याच्या हल्ल्यात ठार होत असल्याने पशुपालकांचे आर्थिक नुकसान होत आहे. सलग दोन दिवसांत दोन शेळ्या ठार झाल्याने शेतकरी धास्तावले असून, पशुधनाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जेऊर कुंभारी परिसरातील शेतशिवारात बिबट्याचा वावर असल्याने शेतकऱ्यांना शेतात काम करताना तसेच जनावरे सांभाळताना विशेष खबरदारी घ्यावी लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी जनावरांचे संरक्षण करणे पशुपालकांसाठी आव्हान ठरत आहे. बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनांची वनविभागाने तातडीने दखल घेऊन घटनास्थळाची पाहणी करावी, बिबट्याच्या वावराचा शोध घ्यावा, परिसरात गस्त वाढवावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच बिबट्याच्या हल्ल्यात नुकसान झालेल्या पशुपालकांना नियमानुसार नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जेऊर कुंभारीचे उपसरपंच जालिंदर चव्हाण यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!