Friday, October 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedदुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी, वीज बचतीसह अनावश्यक खर्च टाळा; मा. आ. स्नेहलताताई कोल्हे...

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी, वीज बचतीसह अनावश्यक खर्च टाळा; मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांचे आवाहन!!

कोपरगाव प्रतिनिधी

संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळाचे संकट ओढवले असून, अशा परिस्थितीत प्रत्येक नागरिकाने पाणी आणि विजेची बचत करण्याबरोबरच अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे आहे. दुष्काळाला सामोरे जाताना प्रत्येकाने आपल्या हौसेला मुरड घालावी, विनाकारण बाहेर फिरणे टाळावे आणि उपलब्ध साधनसंपत्तीचा काटकसरीने वापर करावा. तसेच, या कठीण परिस्थितीत सर्वांनी एकमेकांना आधार द्यावा, असे आवाहन मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी केले आहे.महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुक्यातील सर्वच गावांमधील नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पाणी आणि विजेची बचत करण्यावर भर द्यावा. पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून, पाण्याचा अपव्यय टाळणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्याचबरोबर विजेचा काटकसरीने वापर करावा, शक्यतो बाहेरगावी फिरणे टाळावे, आणि अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. बचत आणि काटकसर हाच दुष्काळाच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आपल्याला अवलंबायचा उपाय आहे, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात बचतीला प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
दुष्काळी परिस्थितीत समाजातील प्रत्येक घटकाने एकमेकांच्या अडचणी समजून घेऊन गरजूंना शक्य ती मदत करावी. शेतातील सोयाबीन मका आदींचे भूस पेटवून न देता मुक्या जनावरांसाठी शिल्लक ठेवावे.संकटाच्या काळात परस्परांना धीर देत सहकार्याची भावना जपणे महत्त्वाचे आहे. एकमेकांच्या पाठीशी उभे राहून या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत. आपण सर्वजण मिळून एकमेकांना साथ देत या दुष्काळाच्या संकटावर नक्कीच मात करू, असा विश्वासही मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी व्यक्त केला.दुष्काळी परिस्थितीत तापमानात वाढ होत असल्याने नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे. विशेषतः भर उन्हात बाहेर जाणे टाळून स्वतःच्या तसेच कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी. दुष्काळाच्या कठीण परिस्थितीत संयम, काटकसर आणि परस्पर सहकार्याच्या माध्यमातून या संकटाचा सामना करणे आवश्यक आहे. पाणी, वीज आणि पैशांची बचत करण्याबरोबरच एकमेकांना आधार देऊन आपण या परिस्थितीवर नक्कीच मात करू, असे आवाहन मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!